जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात
धर्मेंद्र सातव यांना रक्तदान चळवळीत करत असलेल्या कामाबद्दल महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महानगरपालिकेचे सामाजिक विभागाचे उपयुक्त नितीन उदास व समाज कल्याण अधिकारी रामदास चव्हाण यांच्या शुभहस्ते देण्यात आले . यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त राजेंद्र भोसले व दिव्यांग कल्याण आयुक्त राजेश पुरी साहेब महाराष्ट्र राज्य कार्यक्रमास उपस्थित होते.
धर्मेंद्र सातव यांनी आत्तापर्यंत 56 वेळा स्वतः रक्तदान केलेले आहे तसेच बारा वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करून शिबिरात जमा झालेल्या रक्तपिशव्या जिल्हा रुग्णालय यांना दिलेले आहेत.
समाजामध्ये रक्तदानाबद्दल असलेले भीती दूर करण्यासाठी सातव हे सतत रक्तदान बद्दल जनजागृती करत असतात.
धर्मेंद्र सातव यांच्या रक्तदान चळवळीत केलेल्या या कार्याची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेने त्यांना प्रमाणपत्र. सन्मान चिन्ह . शाल श्रीफळ सन्मानित केले.
Discussion about this post