प्रत्येक सिग्नल तुमच्यासाठी राहील ‘ग्रीन’!!छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी कृष्णा सोलाट महापालिकेने शहरात १४ अत्याधुनिक सिग्नल बसविले असून, लवकरच हे सर्व नवीन सिग्नल सुरू होतील, अशी माहिती मनपाच्या विद्युत विविध भागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी पत्रकारांना दिली.
१ जानेवारीला गजानन महाराज चौकातील सिग्नलची टेस्टिंग घेण्यात आली होती. राष्ट्रीय शुद्ध हवा योजनेच्या निधीतून ९ ठिकाणी तर मनपा निधीतून ५ ठिकाणी अशा १४ ठिकाणी स्मार्ट सिग्नल बसविले आहेत. विशेष म्हणजे, उद्धवराव पाटील चौक, धूत हॉस्पिटल येथील टी पॉइंट आणि केम्ब्रिज चौक या ठिकाणी प्रथमच सिग्नल बसविले आहेत.
वाहतुकीला शिस्त लागण्यासोबतच सिग्नलवर प्रदूषण कमी व्हावे या दृष्टीने प्रत्येक चौकाचा अभ्यास यासाठी करण्यात आला आहे.सिग्नल उभारण्याची जबाबदारी महापालिकेकडे असते.
शहरात महापालिकेने ४२ सिग्नल उभारले आहेत. सर्वाधिक वर्दळीच्या जालना.पोलीस नाहीत, सिग्नलही बंद…शहरातील १० चौकांतील सिग्नल सुस्थितीत असूनही बंद ठेवले जात आहेत. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याचे कारण पोलीस विभागाकडून दिले जाते. परिणामी मोंढा नाका, चंपा चौक, सिल्लेखाना चौक, टेलिफोन भवन चौक, आमखास मैदानाजवळील सिटी क्लब, जवाहरनगर पोलीस स्टेशनसमोरील चौक, एसबीओए शाळेसमोरील चौक, कोकणवाडी चौक यासह १० चौकांतील सिग्नल बंद ठेवले जातात.
Discussion about this post