जळकोट, दि.१६(सचिन वामन कदम): तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील राजा भगीरथ सगर – गवंडी समाज संघटनेच्यावतीने राजा भगीरथ यांची जयंती साजरी करण्यात आली.
राजा भगीरथ यांच्या जयंतीनिमित्त गावातील राजा भगीरथ सगर – गवंडी समाज संघटना एकत्रित येऊन विविध कार्यक्रम घेतले. यात हरी भजनाचा कार्यक्रम पार पडला. गुरुवारी सकाळी राजा भगीरथ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पत्रकार मेघराज किलजे यांनी विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, राजा भगीरथ यांनी कठोर तपस्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले.
आपल्या तपश्चर्याच्या बळावर पृथ्वीतलावर गंगा आणली. त्यामुळे आज या धर्तीवर पाणी आहे. भगीरथ प्रयत्न करून राजांनी आपली प्रजा फुलवली. त्यांच्या विचाराचे अनुकरण समाजाने करावे. समाजानी एकत्रित संघटित होऊन समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावावेत. प्रभू श्रीरामचंद्र सूर्यवंशी भागीरथ राजाचे वंशज आहेत. त्यांच्याप्रमाणे राम बनण्याचा प्रयत्न प्रत्येकानी करावा. या कार्यक्रमात राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. शुभांगी खंडू चंदे हिने सोलापूर येथे पार पडलेल्या दांडपट्टा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राजा भगीरथ जन्मोत्सव समिती अध्यक्ष प्रशांत सगर, उपाध्यक्ष लक्ष्मण सगर , समाज बांधव, महिला , युवक आदि उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Discussion about this post