वाशी तालुक्यातील चारही मंडळामध्ये जून २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान अतिवृष्टी झाली होती. त्या अनुषंगाने शासनाकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर नुकसान भरपाई प्रस्ताव शासनाकडून मंजूर झालेला असून लवकरच नुकसान भरपाई रक्कम संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जाणार आहे.
नुकसान भरपाई वाटपाच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील २३०५८ शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन प्रणालीला अपलोड केलेले असून त्यास मंजुरी मिळालेली आहे. या २३०५८ शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे दिलेल्या असून, सदर यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन विनामूल्य e-kyc करून करून घेतल्यावर नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
तसेच ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे या यादीत नाहीत त्यांनी संबंधित गावच्या तलाठ्यांना संपर्क त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी.
संदर्भ :- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, वाशी
Discussion about this post