दिनांक 16 जानेवारी वार गुरुवार पाचगणी नगर परिषदेसमोर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष किरण बगाडे यांच्या दिशा निर्देशानुसार वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते ,वाई तालुका युवक अध्यक्ष आकाश भाई गायकवाड, शहराध्यक्ष रनवीर परदेशी, संतोषजी चव्हाण, भाई भाई फ्रेंड सर्कलचे अक्षय भाई गायकवाड, दादा जाधव
आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाचगणी नगर परिषदेसमोर दि वाल्मिकी नगर हाउसिंग सोसायटी मध्ये प्लॉट नंबर 15वर बेकायदेशीर बांधकाम सुरू असून सदर काम विनापरवाना आहे, आणि सदर बांधकाम धारकाने प्लॉट नंबर 21 वर देखील अतिक्रमण केले आहे
या विषयावर फौजदारी गुन्हा दाखल करा ,डी वाल्मिकी नगर हाउसिंग सोसायटीवर प्रशासकांची नेमणूक करा आणि तात्काळ संबंधित बांधकाम अतिक्रमण जमीनदोस्त करा,
या मागण्यांसाठी तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाकडे मात्र पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव हे या दुर्लक्ष करत तसेच स्वतःच्या धुंदीत गाडीत बसून निघून गेले. या अनधिकृत बांधकामावर नगरपरिषदेचाच वरदहस्त आहे हे मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिवरन आता पूर्णपणे जनतेच्या लक्षात आले आहे ,
आणि आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून. हे आंदोलन आता येत्या 26 जानेवारी पासून बेमुदत उपोषणात परिवर्तित होऊन माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्या दालनाबाहेर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे छेडण्यात येणार आहे असे देखील महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले.

Discussion about this post