
लोणार ता प्रतिनिधी :-सुनिल वर्मा
“बनमेरू विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे स्व. जे.डी. भुतडा विद्यालयात यशस्वी आयोजन”स्थानिक, लोणार येथील कै. कु . दुर्गा क बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार यांच्या वतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व स्व. जे डी. भुतडा कलानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी स्कूल कनेक्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2.0 अभियान कार्यशाळेचे आयोजन स्व. जे डी. भुतडा कलानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कारेगाव च्या प्रांगणात घेण्यात आले. या कार्यशाळे करिता प्रमुख आयोजक म्हणून प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू, कै कु. दुर्गा क. बनमेरु विज्ञान महाविद्यालय, लोणार, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चे डॉ. भुतडा बहुउद्देशीय संस्था, सुलतानपूर चे अध्यक्ष मा. श्रीरामजी भुतडा, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून एनएपी ट्रेनर प्राध्यापक सौरभ गायकवाड, तसेच प्रमुख अतिथी म्हणून , श्री मनोजकुमार भुतडा (सचिव, डॉ. भुतडा बहुउद्देशीय संस्था, सुलतानपूर), कु. शिवगंगा दुंड्यार (प्राचार्य, स्व. जे डी. भुतडा विद्यालय, कारेगाव ), प्रा. आकाश शेजुळ , प्रा. राजू आसोले इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.सर्वप्रथम मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. सौरभ गायकवाड यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य स्तंभ, शैक्षणिक आकृतीबंध, यामध्ये विद्यार्थ्यांना असलेले विविध विषयांची निवड व आपल्या कलागुणांना विकसीत करण्याचे स्वातंत्र्य, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी स्वावलंबी कसा होतो याबाबतीत सखोल अशी माहिती दिली. सोबतच त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन भविष्यातील अभ्यासक्रमात होणारे बदल आणि त्याचे फायदे विद्यार्थ्यांना समजाऊन सांगितले.यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांनी या स्कूल कनेक्ट अभियानाचा उद्देश स्पष्ट केला तसेच आपल्या लोणार येथील बनमेरू महाविद्यालय या शैक्षणिक धोरणासाठी सर्व बाबीने कसे सुसज्ज आहे याबाबत माहिती दिली. कु. शिवगंगा दुंड्यार (प्राचार्य,स्व. जे डी. भुतडा विद्यालय, कारेगाव), यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये झालेले बदल अतिशय महत्वाचे असून यातून नक्कीच रोजगार क्षम विद्यार्थी घडतील आशावाद व्यक्त केला.यानंतर आपले अध्यक्षीय मनोगतातून डॉ. श्रीरामजी भुतडा यांनी नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे आणि जवळपास तीन दशकांनंतर होणारे शैक्षणिक धोरणातील बदलास आपण तयार राहावे आणि यातून नक्कीच चांगले विद्यार्थी घडतील असा आशावाद व्यक्त केला. सदर कार्यशाळेत या विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. आकाश शेजूळ यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन श्री.एम. बी. राठोड सर यांनी केले. कार्यशाळेकरिता स्व. जे. डी. भुतडा विद्यालय, कारेगाव येथील शिक्षवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नववी ते बारावी या वर्गातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Discussion about this post