सदस्यता अभियानास शुभारंभ
आजाद समाज पार्टीचीं जिल्हा पदाधिकारी बैठक 16 जानेवारी रोजी पक्ष कार्यालयात जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी पूर्वी पक्षाचे काम प्रत्येक गावात पोहचवीण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे असे आदेश धर्मानंद मेश्राम यांनी दिले.
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शिक्षण आणि शाळे संबंधित असणाऱ्या समस्यांवर, शाळेच्या कमजोर व पडीत इमारती विरोधात मोठे जन आंदोलन लवकरच करण्यात येणार असल्याचे आजाद समाज पार्टीचे जिल्ह्याध्यक्ष राज बन्सोड यांनी दिले. शिक्षण बजेटवर आणि त्यात आदिवासी शिक्षणावर खर्च यावर सुद्धा काम करणार असल्याचे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी सांगितलं, आणि पक्षाच्या सभासद नोंदणी कार्यक्रमाची सुरुवात विनोद मडावी यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रत्येक गावात जाऊन सदस्यता नोंदणी कार्यकर्ते करणार असून ज्यांना पक्षाचे सदस्य व्हायचे आहे त्यांनी पक्ष कार्यालयात सुद्धा येण्याचे आवाहन करण्यात आले.
या दरम्यान जिल्हा महासचिव पदी चेतन काटेंगे जे नूकतेच आरमोरी विधानसभा लढले त्याची निवड करण्यात आली, जिल्हा कोषाध्यक्ष पदी नागसेन खोब्रागडे तर युवा आघाडी गडचिरोली तालुकाध्यक्ष पदी नितेश वेस्कडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच विद्यार्थी आघाडी समन्वयक म्हणून प्रदीप बांबोळे यांची निवड झाली.
31 जानेवारी ला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. भाई चंद्रशेखर आजाद यांचा चिमूर येथे दौरा आहे त्याचे नियोजन करण्यात आले.
सभेला जिल्हा संघटक हंसराज उराडे, प्रवक्ते प्रितेश अंबादे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते जगदीश बद्रे, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषीं सहारे, गडचिरोली विधानसभा प्रभारी धनराज दामले, महिला आघाडी सचिव शोभा खोब्रागडे, युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, गड. विधानसभा उपाध्यक्ष जितेंद्र बांबोळे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार चामोर्शी युवा अध्यक्ष सिद्धांत भडके, चामोर्शी कंत्राटी तालुकाध्यक्ष सोनू कुमरे, घनश्याम खोब्रागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी:- प्रविण डी कोवाची (9637165828)
Discussion about this post