
वडवणी तालुक्यातील मौजे पिंपळटक्का येथे दरवर्षीच्या परंपरेनुसार याही वर्षी पिंपळ टाका येथे असलेल्या बालाघाटच्या डोंगर रांगावर असलेल्या कानिफनाथ देवस्थानची यात्रा लवकरच सुरू होत आहे, यात्रेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल बुधवार दिनांक 22.1.2025 रोजी संदल मिरवणूक होईल गुरुवार दिनांक 23.1.2025 रोजी देवाचा छबिना व पालखी मिरवणूक होईल, तसेच शुक्रवार दिनांक चोवीस एक 2025 रोजी जंगी मातीतील कुस्त्याचा कार्यक्रम होईल

मौजे पिंपळटाका येथे 22 ,23 व 24 जानेवारी 2025 यातारखी दरम्यान देवस्थान कानिफनाथ यात्रेनिमित्त येणारे पिंपळटक्का नगरीत सर्व भावीक-भक्तांचे सहर्ष स्वागत आहे, यादरम्यान आयोजित केलेल्या मातीतील जंगी कुसत्याच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या मल्लांचे व प्रेक्षकांचे सुद्धा सहर्ष स्वागत आहे,या निमित्ताने मी गावातील सर्व तरुणांना आवाहन करतो की , यात्रेदरम्यान हा प्रत्येक कार्यक्रम केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून आपण सर्वांनी आनंद घ्यावा, व कोणत्याही वाईट कृत्यास बळी पडू नये व आपल्या हितचिंतकांना सुद्धा हा संदेश द्यावा ही नम्र विनंती आहे,आपण या गावातील एक जबाबदार तरुण व गावचे नागरिक म्हणून या कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने मिळुन घ्याय्याची आहे, पत्रकार इंद्रमोहन कदम यांच्या मार्फत आपल्याला “मराठी आस्मिता युवा प्रतिष्ठान” (अराजकीय) सामाजिक संघटना ,आपल्याला एक चांगला संदेश देत आहे
Discussion about this post