
तळेरे आदर्श व्यापारी संघटनेचा ६८ वा वर्धापनदिन सोहळा रविवार १९ जानेवरी २०२५ संपन्न होणार असून दरवर्षीप्रमाणे श्री.सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जि. व्यापारी महासंघ अध्यक्ष श्री. प्रसादजी पारकर, कार्यवाह श्री. नितीन जी वाळके, सहकार्यवाह श्री. चंद्रकांत जठार, कोषाध्यक्ष श्री. अरविंदजी नेवाळकर, तळेरे सरपंच श्री हनुमंत तळेकर, उपसरपंच सौ. रिया चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुजेनिमित्त स्थानिक भजने, महिलांसाठी हळदी – कुंकू, २० -२० डबलबारी भजनाचा सामना बुवा श्री. तेजस नारकर(पाचल – राजापूर ) व श्री. प्रविण सुतार (पुरळ-देवगड) यांच्यात होणार आहे. तसेच वामनराव महाडीक विद्यालयाची राज्यस्तरीय स्पर्धेत यश प्राप्त जिव्हाळ्याची आये ही एकांकिका व गावय ही कोकणातील परंपरेवर आधारित एकांकिका अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच या वर्षीचा यशस्वी उद्योजक , उत्कृष्ट कार्यकर्ता व उत्कृष्ट सामाजिक संस्था पुरस्कार प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. तरी या सोहळ्यासाठी उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आदर्श व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
Discussion about this post