
भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे सुशोभिकरण करणार
बौद्धगया बिहार येथे सामाजिक न्यायभवन उभारणार
एसटी, एससी वस्तीगृहात सोयीसुविधा निर्माण करणार
खोपोली/ मानसी कांबळे :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी शुक्रवार, दि. 17 जानेवारी 2025 रोजी भेट घेतली. या भेटीदरम्यान तुषार कांबळे यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी ना. शिरसाठ यांनी सांगितले की, भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे सुशोभिकरण करण्यात येईल. या परिसरात सोयीसुविधायुक्त, माहितीयुक्त भवन उभारून विजयस्तंभाची माहिती युवा पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याचप्रमाणे बिहार येथील बौध्दगया परिसरामध्ये लवकरच सामाजिक न्यायभवन बांधण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली. त्याचप्रमाणे एसटी, एससी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना जलदगतीने सोयीसुविधा देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असेही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले. याप्रसंगी आरपीआय महाराष्ट्र प्रदेश नेते अरुण पाठारे, विलास जाधव, विष्णु शिंदे, विजयकुमार पालवे, नितीन निटनावरे, विक्रम मेटे, रामलिंग जाधव, तानाजी कांबळे, विनोद विद्याधर, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.
Discussion about this post