
धर्माबादःता/प्र तालुक्यातील संगम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काल रात्री शॉर्टसर्किटने आग लागून जवळपास दीड लाखाचे साहित्य जळून खाक झाले. यामध्ये संगणक प्रणाली, साऊंड सिस्टम, व्हीलचेअर फायबर चेअर व इतर साहित्याचा समावेश असून सदरील आग ही रात्रीच्या वेळी लागल्याचे मुख्याध्यापक साळुंखे व सरपंच प्रतिनिधी विठ्ठलराव आष्टे प्रस्तुत प्रतिनिधींना सांगितले. उपरोक्त पार्श्वभूमीवर शॉर्टसर्किटने आग लागण्याच्या घटना वाढत असून यामध्ये उंदरांचा प्रादुर्भाव, त्यामुळे त्यांच्याद्वारे होत असल्याची वायर कटिंग या गोष्टी प्रामुख्याने जबाबदार असल्या तरी सदरील वायर फिटिंग निकष पूर्ण आहे का हा विषयही महत्त्वाचा आहे
Discussion about this post