रांजणगाव(शे. पुं.): येथील राजमाता जिजाबाई प्राथमिक शाळा, कै. हौसाबाई शिंदे मा.विद्यालय व राजमाता जिजाबाई इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजमाता जिजाऊ भोसले’ व ‘स्वामी विवेकानंद’ यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्षा ताराबाई शिंदे होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव किसन शिंदे, संस्थेचे सहसचिव संजय दारवंटे,संस्था कोषाध्यक्ष गणेश पवार, संस्था सदस्य गोकुळ शिंदे, संस्था सदस्य ज्योतीताई दारवंटे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद तेलप, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब कटारे, अनिल देवरे,सोनाली बखाल, विजय कोलते, राजेंद्र मोकासरे, रविचंद्र साळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेचे विद्यार्थी व सांस्कृतिक ढोल व झांज-लेझिम पथकासहित भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांचे चरित्र सांगणारे गीते,नाट्य प्रसंग व उत्कृष्ट भाषणे सादर केली. राजमाता यांची वेशभूषा शाळेतील विद्यार्थिनी चंचल गायकवाड व स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा विद्यार्थी गणेश गबाळे यांनी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गीतांजली महालकर, सूत्रसंचालन कुमार बिरदवडे तर आभार प्रदर्शन शारदा पुरी यांनी केले. तर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Discussion about this post