प्रतिनिधी शहापूर तालुका सगीर शेख
शहापूर तालुक्यातील लाडक्या बहिणीवर डबल्याचे पाणी हंड्यात भरण्याची वेळ आली आहे फुगाळा आधावाडी वरसवाडी विहिरी कोरड्याठाक पडल्याने महिलांना डोंगर दरीतून मैलोनमैल पायपीट करून पाणी आणावे लागत आहे तसेच डबक्यां भोवती दिवसरात्र खडा पाहारा देऊन भांड्यावर कापड लावून डब्यातून मिळणारे पाणी वाडग्याने खरवडून घ्यावे लागते गावात पाण्याचा टँकर यावा यासाठी नागरिकांनी अनेकदा मागणी केली मात्र तरी देखील याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे सरकारचे ह्दय दगडाचे आहे की काय कोट्यवधींच्या योजना गेल्या कुठे असा औ सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
Discussion about this post