लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात
दिनांक १७ जानेवारी २०२५
लोणार -स्थानिक भूमी अभिलेख कार्यलयात कार्यरत लोकसेवक उमेश पंडीतराव सानप , वय ३९ वर्ष, पद- भुकरमाफक उपअधीक्षक कार्यालय रा. खटकेश्वर नगर लोणार,
यांनी तक्रारदार यांच्या कडून
तडजोडीअंती ६०हजार रुपये
लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यानी माऊली गजानन हॉटेल बसस्थानका जवळ साफळा रचून रंगेहाथ पकडल्याची घटना दि. १७ जानेवारी रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली.
यातील तक्रारदार यांनी प्लॉटची आखणी व मोजणी लवकर करण्यासाठी लोकसेवक हे ८० हजार रुपये मागणी करीत असल्याची तक्रार लाच लूचपत विभाग बुलढाणा यांच्याकडे प्राप्त झाली होती.१७ जानेवारी रोजी लाच पडताळणी कारवाई आयोजीत केली असता.भुकरमाफक उमेश सानप यांनी तक्रारदार यांना ८० हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेचा पहिला हप्ता ६० हजार रुपये स्वीकारण्यास समती दर्शवून उर्वरित २० हजार रुपये काम झाल्यावर स्वीकारण्याचे मान्य केले.आयोजित साफळा कारवाई दरम्यान लोकसेवक उमेश सानप यांना पंचासमक्ष लाचेचा पहिला हप्ता ६० हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.लोकसेवक यांना ताब्यात घेऊन त्यानंच्या विरुद्ध लाच मागणी बाबत लोणार पोलीस स्टेशन येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधीनियम१९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सदर कार्यवाही ही
मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती, सचिद्र शिंदे अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती
यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती शितल घोगरे,पोलीस उपअधीक्षक,साफळा पोलीस निरीक्षक रमेश पवार,साफळा मदत पथक सफौं. श्याम भांगे,पोहेका,प्रवीण बैरागी,जगदीश पवार, विनोद लोखंडे,रंजीत व्यवहारे,शैलेश सोनवणे,नितीन शेटे यांनी पार पाडली.
प्रतिनिधि अबुतालीब खान सुलतानपूर
Discussion about this post