हिंगनघाट:- दिनांक 18/01/2025 रोजी पोलीस ठाण्यात हजर असताना माहिती मिळाली की, एक लाल रंगाचे सोनालीका ट्रॅक्टर हे वना नदीच्या डकिंग पात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून डकिंग रोडने यांना शहरात वाहतूक करीत आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. प्रभारी ठाणेदार चंद्रकांत पाटील सा. यांना देवून त्यांचे आदेशाने गुन्हे प्रकटिकरण पथक व पोस्टाँप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे लोटन चौक येथे नाकेबंदी करीत असताना हिंगणघाट टाउन कडे येणाऱ्या ट्रॅक्टरला थांबण्याचा इशारा देऊन थांबविले व ट्रॅक्टर व ट्रॉलीची पंचा समक्ष पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये काळी रेती भरून असल्याचे दिसले. सदर वाहन झालकास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पराते वय 39 वर्ष रा.माता मंदिर वॉर्ड हिंगणघाट असे सांगितले. वरून सदर आरोपीस वाहन मालक व वाहनाच्या कागदपत्रबाबत विचारले असता सदर वाहन मालक व चालक स्वतः असल्याचे व वाहणाचे कागदपत्र नसल्याबाबत सांगितले.सदर वाहन चालक आरोपीच्या ताब्यातुन 1)1.20ब्रास रेती कि. 7000 रु 2) बिना क्रमांकाचा लाल रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर किंमत 4 लाख रु.3) ट्रॉली क्रमांक MH 32 A 7332 किमत 1 लाख एकूण जु. कि. 5, 07, 000 रु चा मुद्देमाल जप्त करून सदर ट्रॅक्टर चालक विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
बॉक्स
संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. यांचे निर्देशानुसार मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक हिंगणघाट व प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.
Discussion about this post