उदगीर/कमलाकर मुळे :उदगीर येथील मराठा शिक्षण प्रसारक मंडळ,या मंडळाचे नुतन अध्यक्ष म्हणून देविदास तुकाराम आवटे तर सचिव पदी नवटक्के बाबुराव नागोराव यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
मराठा शिक्षण प्रसारक मंडळ,उदगीर द्वारा संचलीत राजश्री शाहू विद्यालय उदगीर व विश्वनाथ चलवा प्राथमिक विद्यालय उदगीर,या दोन्ही विद्यालयाचे नुतन अध्यक्ष म्हणून देविदास तुकाराम आवटे,तर सचिवपदी बाबुराव नागोराव यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबदल राजर्षी शाहू विद्यालयाचे सर्व कर्मचारी,तसेच विश्वनाथ चलवा विद्यालयाचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने नुतन अध्यक्ष व सचिव व कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.या निवडीबदल सर्वञ अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
Discussion about this post