विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

राळेगांव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो.निर्णयक्षमता, सहानुभूती, शिस्त आणि सहकार्याची भावना निर्माण होते. आणि या गुणांच्या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो. हे मोलाचे विचार जोपासत दरवर्षी प्रमाणे या वर्षी सर्वोदय विद्यालयात कबड्डी, क्रिकेट, खो-खो, हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन शाळेचे मुख्याध्यापक. टी.झेड.माथनकर यांच्या हस्ते झाले.व क्रीडा स्पर्धेचे सुत्रसंचालन व्हि.एन.लोडे यांच्या कडे होते. सर्व खेळाडू आपले सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते. अनेक चुरशीचे सामने झाले. विद्यार्थ्यांनी सामने बघण्यासाठी मैदानात गर्दी केली होती. हा क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक, पि.पी.आसुटकर, आर.एस.वाघमारे, शिक्षकेतर कर्मचारी बी.बी.कामटी,व्हि.टी.दुमोरे,एस.वाय.भोयर,एस.एम.बावने यांच्या सह अरविंद कोडापे व विद्यार्थ्यी उपस्थित होते.
Discussion about this post