नांदेड (प्रतिनिधी)
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रसाद बाळासाहेब कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी, नांदेड यांना शासन निर्णयांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्याबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, शासनाने वेळोवेळी जनतेच्या कामांच्या जलदगती प्रक्रियेसाठी आणि कार्यालयीन कर्मचारी व जनतेच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. परंतु या निर्णयांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने जनतेला अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे.
महत्वाच्या मागण्या:
- शासन निर्णयांची प्रति उपलब्ध करणे:
सर्व अधिनस्त कार्यालय प्रमुखांना शासन निर्णयाच्या प्रती पुरविण्यात याव्यात. - अंमलबजावणीसाठी आदेश निर्गमित करणे:
शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित आदेश निर्गमित करावेत. - नियमित आढावा:
जिल्हाधिकाऱ्यांनी दौऱ्याच्या वेळी अंमलबजावणीची स्थिती स्वतः तपासावी. - कारवाईचा अहवाल उपलब्ध करणे:
केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अर्जदारास पुरविण्यात यावा.
निवेदनाची मागणी:
प्रसाद कुलकर्णी यांनी नम्र विनंती केली आहे की, जनतेच्या समस्यांचे निराकरण वेळेवर होण्यासाठी आणि कार्यालयीन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी त्वरित पावले उचलावीत.
जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांवर काय कार्यवाही केली जाते, याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Discussion about this post