प्रतिनिधी:- खुशाल डोंगरवार
7588789975/9158573180
लाखांदूर:-जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या अमुलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असे वक्तव्य पंचायत समिती लाखांदूर चे गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी केले. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये होत असलेल्या नवीन शैक्षणिक बदलांची ओळख होण्यासाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण शिक्षकांसाठी फार महत्त्वाचे आहे,असे वक्तव्यभगवान वरवटे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांनी केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा स्टार्स व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 तालुकास्तरीय प्रशिक्षण मातोश्री बाळजाबाई बुरडे विद्यालय आसोला येथे आयोजित करण्यात आलेले आहे याच्या टप्पा एकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लाखांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री तत्वराज अंबादे, श्री भगवान वरवटे ,शिक्षण विस्तार अधिकारी ,प्रमुख अतिथी म्हणून टी. आय. धांडे सर मुख्याध्यापक मातोश्री बाळजाबाई बुरडे विद्यालय आसोला, केंद्रप्रमुख रवींद्र शिवहरकर, केंद्रप्रमुख यशपाल बघमारे, केंद्रप्रमुख गोरखनाथ वंजारी, केंद्रप्रमुख दु.ना. बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणाला तालुकास्तरीय सुलभक म्हणून प्राथमिक विभागाला के.के डोंगरवार, एस.टी. सिंगनजुडे,डी.डी.नागोसे,जे.व्ही.कुरसुंगे, एस.जे. करसाल,बी.एम. नैताम,वाय.आर. शेंडे,माध्यमिक विभागाला पी.डब्ल्यू.पारधी, सौ वी. एम. लिचडे,एन. टी. धुर्वे,कु. एस. एम. चौरे,सौ एस. जी. भैसारे, श्री के. आर.पालांदुरकर,आय.डी.नागोसे,एन.सी. ढोलणे हे आहेत.
सदर टप्पा एकचं प्रशिक्षण दिनांक 10 फेब्रुवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार असून,सदर टप्पा यशस्वी होण्यासाठी पंचायत समिती लाखांदूर चे साधन व्यक्ती श्री चौरे,भोवते मॅडम, श्री घोडीचोर, श्री पिलारे, श्री पारधी, श्री कावळे, श्री सांदेवार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन साधन व्यक्ती मूलचंद गहाणे यांनी केले.
Discussion about this post