राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत सुरू
किल्ले धारूर :- ११ फेब्रुवारी
येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये दिनांक १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ बोर्ड परीक्षा २०२५ सुरळीतपणे सुरू झाली. प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा यशस्वीपणे संपन्न होत आहे. या परीक्षा केंद्रात कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील बारावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण ४०३ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत.
या परीक्षेसाठी केंद्रप्रमुख म्हणून श्री. वसंत रामभाऊ शिंदे हे परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून यशस्वीपणे कार्य करत आहेत. परीक्षा केंद्रास प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी भेट दिली. परीक्षेसाठी पोलीस बंदोबस्त असून पोलीस कर्मचारी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा सुरळीत होण्यासाठी उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा संपन्न होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
Discussion about this post