मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि. 11 फेब्रुवारी रोजी पोलीसांनी टू व्हीलर गाड्यांची तपासणी करून करवाई केली.
पोलीसांनी टू व्हीलरवर तीन सीट बसलेल्या, विना नंबर प्लेटच्या गाडी तसेच कानाला मोबाईल लावून बोलणाऱ्यांची वाहने ठाण्यात नेऊन कारवाई करण्यात आली.
पो स्टे मानोरा येथे आज रोजी मा. पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांनी Api , Psi. , व पोलीस स्टॉफ व होमगार्ड यांचेसह अचानक पणे 7.00 वां. नाकाबंदी लावण्यात येऊन मोटार वाहन कायद्यअंतर्गत ट्रिपल शीट वाहन चालवणारे, वाहन चालवताना मोबाईल वर बोलणारे, विना परवाना वाहन, अतिरिक्त प्रवासी वाहतूक, तसेच विविध मोटार वाहन कायद्याने कारवाई करण्यात आली.
बॉक्स …
पोलीस स्टेशन मानोरा तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी मोटार वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स तसेच गाडीचे कागदपत्र सोबत बाळगावे. ट्रिपल शीट वाहन चालवू नये , पालकांनी 18 वर्ष आतील मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. वाहन चालविताना मोबाईल वर संभाषण करू नये. याबाबत दक्षता घ्यावी.
Discussion about this post