उपजिल्हा रूग्णालय शिराळा येथे शुक्रवार, दि. 14 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्व रोग निदान उपचार, शस्त्रक्रिया व दंतरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.
या मोफत आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञांमार्फत मोफत तपासणी व उपचार, मोफत औषधोपचार, शक्य त्या सर्व मोफत शस्त्रक्रिया, रक्त, लघवी इत्यादी तपासण्या मोफत, भव्य आरोग्य प्रदर्शन व माहिती, दंतरोगावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थींच्या शस्त्रक्रिया दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये तपासणी करण्यात येणारे समाविष्ट आजार – सर्व सामान्य आजार मोफत तपासणी व रोग निदान, सर्व किरकोळ शस्त्रक्रिया व तपासणी, नेत्र रोग तपासणी, शस्त्रक्रिया व उपचार, अस्थिरोग, स्त्रीरोग, हृदयरोग, मेंदू रोग, कॅन्सर निदान, त्वचा रोग, बालरोग, कान-नाक-घसा तपासणी व शस्त्रक्रिया, सर्व पोट विकार.
Discussion about this post