परभणी जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगर पंचायत म्हणून ओळखले जाणारे शहर पालम त्याच नगर पंचायत चा भोंगळ कारभाराचा नंगानाच पहायला मिळत आहे,या नगर पंचायत कारभारात असलेला भोंगळ आणि दुर्लक्ष सर्व सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात एक फार मोठी समस्या बनली आहे, येथे कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा व्यवस्था यावर शासकीय किंवा प्रशासकीय अधिकारी यांचा दबाव राहिले नाही, शहरातील घाणिचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चालली आहे रस्त्यांवर, गल्ली मोहल्ला नगर आणि सार्वजनिक स्थळावर घान कचरा अस्तव्यस्त पसरलेला दिसतो, यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते कचरा संग्रहण करणारी संस्था सपसेल अपयशी ठरल्याचे दिसून येते,यावर कचरा संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची दुर्लक्षत्वाचि भुमिका आणि स्थानिक नेत्यांचे लेबल यामुळे ही समस्या आणखी वाढत चालली आहे.
स्वच्छ भारत अभियान सारख्या राष्ट्रीय पातळीवर मोहिमांना खो दिल्यासारखे होत आहे शासनाने देखील नियमानुसार अनेक उपक्रम राबविण्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्या साठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित उपकरण उपस्थित असुनही नागरीकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
स्वच्छता,स्वछ पर्यावरण यासाठी अनेक निवेदन, देण्यात येऊनही जबाबदार अधिकारी यांच्या कडून कार्यवाही झालेली नाही यामुळे ते आपापल्या कर्तव्यापासून दुर राहत आहे.स्वास्थ संबंधित घाणिच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, घाणिमुळे पसरणारे रोग, जंतू मुळे नागरिकांना विविध प्रकारच्या आजाराने बळी पडावे लागते, डेंग्यू, मलेरिया, आणि अन्य संक्रमक जे की पहिल्यापासून खतरनाक आहे.
सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेले शौचालय हे देखील शोभेच्या बाहुल्या बनले आहे, योग्य त्या ठिकाणी कचराकुंडी देखील निर्माण करण्यासाठी कार्यरत यंत्रणा कुचकामी ठरलेली दिसत आहे.पालम हे तालुक्याचे ठिकाण,नगर पंचायत
व मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी अशी अवस्था यावर येथील जनतेच्या मनात या स्थिती बाबत संताप व रोष दिसुन येत आहे अनेक नागरिक स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला जात आहे, परंतु पुर्वी पासुन दुर्लक्ष उपलब्ध आहे, नागरिक स्वातंत्र्यता आणि सुव्यवस्थित व्यवस्थापनासाठी अनेक निवेदन, आंदोलन करुनही शासकीय किंवा प्रशासकीय अद्यापपर्यंत कोठेही सकारात्मक परिणाम दिसून आले नाही.
Discussion about this post