प्रतिनिधी निलेश सुर्वे हिंगोली
आज दि 11 फेब्रुवारी ला हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी अर्धनग्न अवस्थेत मुंबईत दाखल झाले आहेत. सरकारने कर्जमाफी करावी, सोयाबीन कापसाचा भावफरक द्या, 100% पीकविमा मिळावा,सोयाबीन खरेदीला मुदत वाढ यासह अन्य मागण्या घेऊन शेतकरी मुंबईत धडकले आहेत.शेतकरी संतप्त झाले आहेत. शेवटी, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते स्वतः नागडे होऊन रस्त्यावर उतरले! मी जुईनगर (मुंबई) येथे त्यांची भेट घेतली, त्यांच्या व्यथा ऐकल्या, त्यांचा संताप समजून घेतला. हा लढा केवळ हिंगोली-वाशिमचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आहे! सरकारने तातडीने शेतकऱ्यांशी चर्चा करावी, आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. नाहीतर हा संताप पेट घेईल..! शेतकरी लढायला तयार आहेत, आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत!
मानखुर्द ते मंत्रालय मुंबई पायी वारी करत मंत्रालयाकडे रवाना

Discussion about this post