प्रतिनिधी : सचिन कोयरे
तालुक्यातील बारड तांडा या छोट्याशा गावातील राहणार्या रोहिदास जाधव यांचा मुलगा जय रोहिदास जाधव याने वेब डिझाईन मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने सुयश मिळविले. जय हा जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेज यवतमाळ येथे द्वितीय वर्षात शिकत असून नॅशनल लेवल टेक्निकल इव्हेंट ऑफ डिप्लोमा अँड इंजिनिअरिंग स्टुडंट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२४-२५ या सत्रामध्ये एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड फॉर बेस्ट ग्रीन कॅम्पस या स्पर्धेत जय रोहिदास जाधव याने वेब डिझाईन या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने सुयश मिळविले. त्यानिमित्ताने जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने त्याचा सत्कार करून प्रशस्तीपत्रासह रोख म्हणुन बक्षिस दिले. या यशाचे श्रेय जयने जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजचे मार्गदर्शक आणि सर्व कर्मचारीवृंदाना देत आई वडील, बहीण आणि नाना आणि गावकर्यांना दिले.

Discussion about this post