उदगीर /कमलाकर मुळे: श्री छञपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात महाराष्ट्रातील महान संत ,कवी,अध्यात्मिक गुरू,समाज प्रबोधनकार म्हणून परिचयाचे असलेले संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड म्हणाले,श्रमात देव शोधणारे संत म्हणजेच रोहिदास महाराज होत.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के,एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड,विभाग प्रमुख विलास शिंदे,नागेश पंगू,श्रीकांत देवणीकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना बालाजी मुस्कावाड म्हणाले,योगी बनून समाजापासून विन्मुख होण्यापेक्षा भक्त बनून समाजात मिसळून जावे,अशी भुमिका मांडत,श्रमात देव शोधणारे संत म्हणून परिचयाचे असलेले महान कवी म्हणजेच रोहिदास महाराज होत असे सांगितले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले संत रोहिदास महाराज यांना लहानपणापासून भजन,कीर्तन आणि अध्यात्माची आवड होती.संपूर्ण आयुष्य जातीवर आधारित विषमतावादी समाज व्यवस्था बदलण्यासाठी खर्ची घातली.तळागाळातील शेवटचा घटक सुखी व्हावा,जाती आणि सामाजिक सलोखा निर्माण व्हावी अशी त्यांची विचारधारा होती.
विद्यालयातील विद्यार्थी गणेश ढाकणे,आर्यन जाधव,साई सांगवे,रेवणनाथ मनसटवाड,शेखर साबणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन विभाग प्रमुख विलास शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत देवणीकर यांनी मानले.यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल महिंद्रकर,प्रल्हाद येवरीकर,विजय कावळे उमाकांत नादरगे,विनायक करेवाड,मारोती मारकवाड यांनी सहकार्य केले.
Discussion about this post