उदगीर /कमलाकर मुळे : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीरात ३ रे लोकसंस्कृती साहित्य संमेलन २०२५ आयोजित करण्यात आले होते.या साहित्य संमेलनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तिंना रंगकर्मी साहित्य कला क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या वेळी शेल्हाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती आशा सूर्यकांत काळे (बडगे)यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव,संमेलनाचे उदघाटक माजी कॅबिनेट मंञी तथा आमदार संजय बनसोडे,रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड,सचिव ज्योती मद्देवाड व उपाध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी,तसेच मान्यवराच्या उपस्थितीत शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन रंगकर्मी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.याबद्दल आशा काळे यांचे सर्व स्तरातील मिञ मंडळी शिक्षक ,शाळेतील सहकारी ,मुख्याध्यापिका अंजली स्वामी,शाळेतील शिक्षिका मंगल केंद्रे ,सोजर जांभळे,कावेरी पांचाळ,पांडूरंग पेठे,शाळा समितीचे अध्यक्ष दिलीप चिखले आदिनी अभिनंदन केले आहे.
Discussion about this post