उदगीर /कमलाकर मुळे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या जेईई मेन्स -२०२५ या परीक्षेत श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेत कौस्तुभ बेजगमवार हा विद्यार्थी ९९.६५ इतके परसेंटाइल गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम आला आहे.प्रज्वल कोटी हा विद्यार्थी ९३.७१ इतके परसेंटाइल गुण घेऊन द्वितीय आला आहे.दर्शन चौधरी हा विद्यार्थी ९१.९६ इतके परसेंटाइल गुण घेऊन तृतीय आला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपुरकर,सचिव उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे,संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे,कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे,संस्थेचे सर्व सदस्य,प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर,उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एम.व्ही.बोळेगावे,एच.एस. व्ही.सी.चे पर्यवेक्षक गायकवाड एस.एस.कार्यालयीन अधीक्षक एच.एम.पाटील,महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Discussion about this post