उदगीर /कमलाकर मुळे: तालुक्यातील डोंगरशेळकी येथील कार्य तत्पर आणि आदर्श असे पोलीस पाटील भालचंद्र शेळके पाटील यांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करून कार्य तत्परता दाखविली आहे.त्याच्या एकूण कामकाजाची दखल घेऊन पोलीस पाटील भालचंद्र शेळके पाटील यांचा नांदेड परिक्षेञाचे डी.आय.जी.शहाजी उमाप यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ व संत साहित्याचे पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.त्यावेळी डी.आय.जी. शहाजी उमाप यांनी परिसरातील सर्व पोलीस पाटील यांना सखोल असे मार्गदर्शन केले.पोलीस पाटील यांनी समाजहिताचे कार्य करत रहावे,प्रशासनाला मदत करत रहावी असे आवाहन परिसरातील सर्व पोलीस पाटीलांना केले.यावेळी लातूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे,अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर व वाढवणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक कोरके व वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील व दक्षता कमिटीचे कार्यकर्ते,महिला दक्षता कमिटीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
पोलीस पाटील हे प्रत्येक गावातील शासन आणि प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा असून त्यांनी सतर्क राहून कायदा आणि सुव्यवस्था त्याचे रक्षण होण्याच्या दृष्टीने काम करावे असेही आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी याप्रसंगी केले.
Discussion about this post