पंडित दीनदयाळ विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रम संपन्न झाला
आजराः प्रतिनिधी,
स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळाचे सचिव मलिककुमार बुरुड व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अण्णासाहेब दिवटे (सर )यांच्या हस्ते विद्येची देवता श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गाण्याच्या नृत्याच्या रूपात शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले वर्षभर शिक्षकांच्या कडून मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे निर्भीडपणे, मनाची एकाग्रता करून मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले यानंतर काही विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली मनोगते व्यक्त करताना मुले भावुक झाल्याचे दिसत होते . जीवनामध्ये कितीही मोठे झालात तरी आपल्या शाळेशी असणारी नाळ ही सतत जोडलेली असावी असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मलिककुमार बुरुड यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता कुंभार यांनी तर पाटील ए एन यांनी आभार मानले
Discussion about this post