
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – आ.विजयसिंह पंडित..
गेवराई :
गेवराई विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी प्रामाणिक काम करत भैय्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील शेती आणि शेतीशी संबंधित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
गेवराई तालुक्यातील वडगांव (चिखली) येथे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते १ कोटी २५ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी रोजी भव्य शुभारंभ पार पडला यावेळी ते बोलत होते. यावेळी स्व.माणिकराव काळे पाटील प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रा.काँ.पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जेष्ठ कार्यकर्ते भागवतराव काळे, पं.स.सदस्य परमेश्वर खरात, जयसिंग जाधव, प्रा.मुकुंद काळे, ॲड.सोमेश्वर काळे, राजेंद्र वारंगे , कृ.उ.बा.स संचालक अशोक खरात , सरपंच मच्छिंद्र ढेरे , संपादक अमोल वैद्य, पत्रकार विनोद पौळ, बाळू वारे, तीर्थराज गवारे, ग्रामसेवक राजेंद्र बन, प्रल्हाद यादव, बापूसाहेब हुंबरे, ग्रा.पं. सदस्य अशोक जाधव सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.पंडित म्हणाले की, मतदारसंघातील अनेक गावांत विविध कामे प्रलंबित आहेत. ती विकास कामे आपल्याला मार्गी लावायची आहेत. राज्यात आपलं सरकार आहे. पाच वर्ष हे सरकार आपलं सरकार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे पाच वर्षात जास्तीत जास्त निधी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणून भैय्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला विविध कामे करायची आहेत. शिवछत्र परिवाराबरोबर मायबाप मतदार आणि तरुण कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला मला साथ दिली. मतदारांच्या खूप अपेक्षा आहेत. सर्वांच्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहेत. आपण दिलेले प्रेम हे विसरुन चालणार नाही. हे जे काही ऋण आहे याच्यातनं कधीच उतराई होणार नाही. कारण दहा वर्षापासून शिवछत्र परिवार संघर्ष करतोय आपण ते उद्दिष्ट साध्य केलं ते तुम्ही करुन दाखवलं त्याच्यामुळे याची जाणीव निश्चितपणाने संपूर्ण परिवाराला आहे. तसेच आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगरपालिकेच्या निवडणूका होतील यातही शिवछत्र परिवार आपल्या सर्वांच्या सहकार्याने वर्चस्व प्रस्थापित करेल असा विश्वास व्यक्त करुन कार्यकत्यांनी यासाठी कामाला लागावे असे आवाहनही शेवटी बोलताना व्यक्त केले.
यावेळी परमेश्वर खरात, भाऊसाहेब नाटकर, मुकुंद काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सुभाष औटे, गुलाब औटे, परमेश्वर काळे, माजी सरपंच बबनराव ओटे, नारायण यादव, राजाभाऊ काळे, सुरेश काळे, नकुल औटे, हताम्रध्वज औटे, जिमुरध्वज औटे, श्रीनिवास काळे, महारुद्र काळे, भाऊसाहेब काळे, अशोक काळे, अभिषेक काळे, भारत काळे, महेश औटे, साईनाथ सुरवसे, विष्णू ठोसर, अशोक जाधव, गहणीनाथ शिंदे, अंगद सुपेकर, शिरु वारे, अशोक औटे, बाबूभाई सय्यद, राघू भोसले, प्रल्हाद राऊत, कल्याण धोत्रे, केशव कदम, अण्णासाहेब सुरवसे, देविदास जाधव, अमोल पवार, अमोल पानखडे, अंगद जाधव , रामनाथ यादव, शिवाजी काळे, कालिदास औटे सह चिखली , सुशी, साठेवाडी, कवडगाव येथील ग्रामस्थांसह आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी स्व.माणिकराव काळे पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक तथा ग्रा.पं.सदस्य वशिष्ट काळे पाटील, बबन काळे, बाळू भोसले, बाबू औटे, सुनील काळे, सतीश काळे, मंगेश काळे, अमर काळे, प्रशांत काळे, भारत काळे, संदीप काळे, दत्ता सुरवसे सह कार्यक्रमाचे प्रास्ताविक वशिष्ट काळे पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मयुरध्वज औटे यांनी व्यक्त केले..
Discussion about this post