
उदगीर / कमलाकर मुळे :
शहरालगत असलेल्या मादलापूर नविन वसाहत येथील जि.प.शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला.लहान बालक चिमुकल्यांनी विविध पोशाख परिधान करून नृत्य सादर करून पालकांसह उपस्थितीतांची मने जिंकली.या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले जेष्ठ निवृत्त शिक्षक विश्वनाथ मुडपे,व्ही.एस.कुलकर्णी,उपसरपंच डाॅ.दत्ता पाटील,पोलीस पाटील अंकुश चव्हाण,ग्रामपंचायत अधिकारी वैजनाथ मोरतळे,आदर्श मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी,आदर्श योग शिक्षिका अनिता संकाये यांची उपस्थिती होती.प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका लेखिका सुनंदा सरदार,-कुलकर्णी यांनी केले.यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बालगीत आदिवासी नृत्य वासुदेव गीत,लावणी, कोळी गीत,देशभक्ती गीत अशी विविध गीते सादर करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सहशिक्षिका बालीका कोचडवाड,शिक्षण सहाय्यक योगेश्वरी धडेवाड,मादलापूर शाळेचे मुख्याध्यापक ओमप्रकाश मद्रेवार व शिक्षण सहाय्यक सुरज गरगटे,अंगणवाडीताई सुप्रिया शिंदे यांनी पुढाकार घेतला..
Discussion about this post