
उदगीर / कमलाकर मुळे :
श्री छञपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयाचे चार विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पाञ ठरले आहेत.जेईई मेन्स परीक्षा जानेवारी २०२५ मध्ये झाली होती.या परीक्षेत सैनिकी विद्यालयाचे चार विद्यार्थी बाबू शिल्लरवाड,अविनाश गोपोड,अनिकेत चाळणेवाड,साईनाथ येलाले हे जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पाञ ठरले आहेत.प्रा.सिमा मेहञे व प्रा.नितीन पाटील,यांनी जेईई मेन्स परीक्षेचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पाञ ठरलेले चार विद्यार्थी व यांना मार्गदर्शन करणारे प्रा.प्रदिप कोठारे,प्रा.शिवाण्णा गंदगे,प्रा.सिमा मेहञे,प्रा.नितीन पाटील,प्रा.युवराज दहिफळे,यांचे अभिनंदन प्राचार्य वसंत कुलकर्णी,पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के,विभाग प्रमुख संतोष चामले,विलास शिंदे व सर्वच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे..
Discussion about this post