चुनाळा येथे शेत बगीचा ला शॉट सर्किटमुळे लागली आग.
- लाखोंचे नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकरी लीलाबाई ईश्वर वडस्कर यांची प्रशासनाकडे मागणी.
- लाल – पांढरे चंदन, रामफळ, सागवान, सिताफळ , ड्रॅगन फ्रूट, स्टार फ्रूट आदींसह ठिबक सिंचनाची पाईप लाईन जळून खाक.
राजुरा 16 फेब्रुवारी
मौजा चुनाळा येथे सौ. लीलाबाई ईश्वर वडस्कर यांची शेत सर्व्हे नंबर ५ आराजी १.४१ हेक्टर आर. शेतजमीन असून याठिकाणी मोठ्याप्रमाणात ठिबक सिंचनाची व्यवस्था करून नाविन्यपुर्ण पद्धतीने उपक्रमशिल शेतकरी ईश्वर वडस्कर यांनी अनेक वर्षांच्या परिश्रमाने ड्रॅगन फ्रूट, स्टार फ्रूट, राम फळ, लाल व पांढरे चंदन, बांबू, निंबु, सिताफळ, आंबा, सागवान आणि ईतर पालेभाज्या यांची मोठ्याप्रमाणात लागवड केली. राजुरा तालुक्यांतील ड्रॅगन फ्रूट, स्टार फ्रूट घेणारे बहुदा ते एकमेव शेतकरी. परंतु दि. १५ फेब्रुवारी ला दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अचानक विद्युत शॉट सर्किटमुळे आग लागल्याने क्षणात होत्याचं नव्हतं झालं. चूनाळा गावचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण केले. दरम्यान गावकऱ्यांच्या मदतीने वडस्कर यांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले परंतु हवेमुळे आग वेगाने पसरली. त्यातच अग्निशमन दलाच्या गाडीला विलंब लागल्याने मोठ्याप्रमात शेतपिकांचे आर्थिक नुकसान झाले. यात बांबु , चंदन ,रामफळ, ड्रॅगन फ्रूट, स्टार फ्रूट, सीताफळ, नींबु, सागवान तसेच ठिबक सिंचनाच्या पाईपचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासन स्तरावर दखल घेऊन नुकसान भरपाई देण्यास सहकार्य करावे अशी मागणीचे निवेदन तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांना देण्यात आले आहे. नावीन्यपूर्ण शेती करून ईतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणाऱ्या ईश्वर वडस्कर यांच्या शेतीचे झालेले लाखोंचे नुकसानीची भरपाई शासनाचे द्यावी अशी मागणी होत आहे.
ईश्वर वडस्कर, शेतकरी, चुनाळा
माझ्या शेतातील वेगळे पीक, वृक्ष, फळबाग बघता मी कृषी व महसुल विभागाकडे या पिकांचे, फळबागेचे विमा काढण्याकरिता अनेकदा चकरा मारल्यात परंतु आपल्या भागात फळबागा हा प्रकार नसल्यानें त्यांचे विमा काढण्याकरिता माहिती उपलब्ध नाही तशी माहिती घेउन कळवीतो अशीच उत्तरे मिळाल्याने मी हताश झालो. डोळ्यासमोर परिश्रमाने आलेले पीक जळून राख झाल्याने फार वाईट वाटतं. प्रशासनाने तात्काळ आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी ईश्वर वडस्कर व त्यांचा परिवाराने केली आहे.
बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था
एखादा उपक्रमशील शेतकरी नावीन्यपूर्ण शेती करून वेगवेगळे पीक घेतो. फळबागा जगविण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेतो तसेच तो शेत पिकांचे विमा काढण्याकरिता तयार असताना कृषी व महसूल विभागाकडून योग्य ती माहिती व सहकार्य मिळतं नसेल तर शेतकरी प्रगती करणार तरी कसे. ड्रॅगन फ्रूट, स्टार फ्रूट, लाल व पांढरे चंदन आदीसह वेगवेगळी फळ झाड लावुन एक आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी प्रशासनाने उभे राहून त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे. तसेच झालेल्या आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी बादल बेले यांनी केली आहे.
Discussion about this post