
उदगीर / कमलाकर मुळे :
मराठवाडय़ाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र डोंगरशेळकी ता.उदगीर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली.या बैठकीत सोसायटीचे चेअरमन हणमंत मुंडे व व्हाईस चेअरमन ज्ञानोबा गुरमे यांनी आपल्या पदाचे काही दिवसांपुर्वी राजीनामे दिल्याने या दोन्ही पदाची नव्याने निवडणूक घेण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी ए.आर.नांदापुरकर यांच्याकडे चेअरमन पदासाठी बालाजी नागनाथ मुंडे तर व्हाईस चेअरमन पदासाठी सौ.सुनिता ज्ञानोबा शेळके यांचे असे दोनच अर्ज आल्याने व वेळ संपल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए.आर.नांदापुरकर यांनी दोन्ही पदाची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
यावेळी सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते.निवडी नंतर ग्रामस्थातर्फे नुतन चेअरमन बालाजी नागनाथ मुंडे व व्हाईस चेअरमन सौ.सुनिता ज्ञानोबा शेळके यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व सोसायटीचे संचालक हणमंतराव शेळके,ज्ञानोबा गुरमे,दत्तात्रय मुंडे,तुकाराम मुंडे,अजय कुलकर्णी,भामाबाई मुंडे,सागरबाई सुर्यवंशी,नामदेव खंदाडे,विजया पवार,मुरलीधर पुंड,उपस्थित होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.आर.नांदापुरकर यांनी काम पाहिले.तर त्यांना गट सचिव जनार्दन शिंदे व अण्णाराव कट्टे यांनी सहाय्य केले.या वेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला.यावेळी माजी सरपंच ज्ञानोबा मुंडे,मावळते चेअरमन हणमंतराव मुंडे,मावळते व्हाईस चेअरमन ज्ञानोबा गुरमे,शिक्षण प्रेमी बाबुराव मुंडे गुरूजी,सुभाष सुर्यवंशी आदी उपस्थित होते..
Discussion about this post