
नळदुर्ग ( प्रतिनिधी ) नळदुर्ग येथील जेष्ठ पत्रकार व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. दिपक तुळशिदास जगदाळे यांचे चिरंजीव राज दिपक जगदाळे यांची महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) येथे प्रकल्प अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. राज दिपक जगदाळे यांच्या यशामागे त्याचे मार्गदर्शक आदरणीय श्री.सतीश पाटील सर, सौ. लताताई सतीशराव पाटील, प्रितम पाटील, शुभम सुरवसे व त्यांचे आई वडील यांचा सिंहाचा वाटा आहे. राज दिपक जगदाळे यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ) पुणे यांचे विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच पदभार स्विकारला आहे..
Discussion about this post