देवेंद्र बट्टे यांची अखिल कुणबी महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती
गोंडपिपरी:अखिल कुणबी महासंघाचं काम (कार्य) संघटन संपूर्ण देशात मजबुत करण्याच्या उद्देशाने अखिल कुणबी महासंघाची स्थापना करण्यात आली.अखिल कुणबी महासंघामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती, कुणबी समाजातील काम, सेवाभावी वृत्ती व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड विचारात घेऊन गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र बट्टे यांची अखिल कुणबी महासंघाच्या चंद्रपूर “जिल्हा कार्याध्यक्ष” या पदावर नियुक्ती करण्यात आली.
अखिल कुणबी महासंघ थोर संत, संत तुकाराम महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांनी वाटचाल करणारी संघटना आहे. महापुरूषांचा विचार कुणबी समाजात रूजवून सर्व पोटजातींना एका विचारात बांधण्यासाठी कुणबी समाज संघटना प्रत्येक तालुका पातळीवर कार्यरत आहे.
पुढील काळात अखिल कुणबी महासंघामध्ये काम करण्याची आवड असणारे व स्वेच्छेने काम करणारे कार्यकर्ते सोबत घेऊन त्यांच्या बरोबर विचार विनिमय करून अखिल कुणबी महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून संघटनेने ठरवून दिलेल्या नियमानुसार काम करून अखिल कुणबी महासंघाचे संघटन वाढवण्याचे प्रामाणिक कार्य करण्याचा विश्वास यावेळी देवेंद्र बट्टे यांनी दिला.
Discussion about this post