गेवराई तालुका प्रतिनिधी गेवराई येथील पंचायत समितीला सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक आग लागून महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची घटना घडली तर अग्निशामक दलाची गाडी या ठिकाणी आग विजवण्यासाठी आली होती.
गेवराई पंचायत समितीला दि. 16 रविवार रोजी सायंकाळी 5 वा.च्या सुमारास अचानकपणे आग लागली ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट झालं नसून या आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली तसेच ज्या रूमला आग लागली होती त्या रूमच्या पाठीमागील साईडला गवतही पेटवून देण्यात आलेले होते त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली हे जरी स्पष्ट झालं नसले तरीही या विषय व तालुक्यातील नागरीकांमध्ये शहरात उलट सुलट चर्चा होताना दिसून येत आहेत त्यामुळे आग लावली की, लागली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून गेवराई नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने ही आग विझवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले व आगीवर नियंत्रण मिळवले परंतु आग विजयपर्यंत एकही कागद शिल्लक राहिला नव्हता सर्व महत्त्वाचे कागदे खाक झाले होते..
Discussion about this post