
(साई सेवाभावी संस्था, कोळगाव यांनी केला बाल कलावंतांचा सन्मान.)
गेवराई (प्रतिनिधी ) : गेवराई शहरातील
सुप्रसिद्ध “आर्ट ऑफ फन अकॅडमी” ने यावर्षी घेण्यात आलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत यश मिळवले व चंपावती महोत्सव उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाकंरडक २०२५ चा जोडी नृत्यमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकासह नृत्य प्रकारामध्ये जिल्ह्यातील सर्वोच्च बेस्ट डान्स टीचरच्या दोन्ही पुरस्कार मिळवत बहुमान मिळवला.
त्याबद्दल आर्ट ॲाफ फन अकॅडमी गेवराई येथे “साई सेवाभावी संस्थेच्या वतीने सहभागी व विजेते स्पर्धकांचा सन्मान करण्यात करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ रत्नमाला (नानी) मोटे,
सौ.माधुरी कुरकुटे,शाहिर श्री.बाप्पु सोनवणे, पत्रकार तथा ॲड. शेख हारुन, उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की दि. १ फेब्रुवारी २०२५ पासून ते ८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत बीडमध्ये 9 दिवसीय जिल्हास्तरीय चंपावती महोत्सव उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाकंरडक २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रतिष्ठित मान्यवर, शिक्षक, स्पर्धक व पालकांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला. चंपावती महोत्सवामध्ये नृत्य, एकपात्री अभिनय, गायन, चित्रकला आणि रांगोळी आदी स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या तर परळी, अंबाजोगाई, शिरूर कासार,बीड आणि गेवराई तालुका तर जिल्ह्यातून एकुण १४००० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्याी स्पर्धकांचा समावेश झाला होता. या सर्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळात बीड जिल्ह्याचा बेस्ट डान्स टीचर पुरस्कारने दिपक गिरी सर व शिवकुमार सोनवणे सर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच, पहिली ते तिसरी गटात, श्लोक मानधने याने एकपात्री अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला तर, जोडी नृत्य मधे श्लोक मानधने व स्वरा झेंडेकर यांना उत्तेजार्थ पारितोषक प्राप्त झाले., आरोही वाघमारे व विदिशा जाधव यांना द्वितीय तर अंनवी खेत्रे व राधिका मोटे यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. तर, चौथी ते सहावी गटात ज्ञानदा जोशी व हिर सोनाग्रा यांना द्वितीय पारितोषिक मिळाले तर, आयुष कांडेकर व काव्या मुंदडा यांना तृतीय पारितोषिक मिळाले.व मन्मथ वादवाणी व आर्या वावरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.तसेच एकपात्री अभिनय स्पर्धेत,ज्ञानदा जोशी हिला द्वितीय, काव्या मुंदडा द्वितीय, तर श्लोक मानधने ला तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच वैयक्तिक नृत्य स्पर्धेत, काव्या मुंदडा व अण्वी मुंदडा यांना परीक्षक पसंती पुरस्कार प्राप्त झाला. व वयक्तिक गीत गायन स्पर्धेत उमंग सोमाणी याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर फॅमिली नृत्य स्पर्धा मधे मानधने परिवार व कांडेकर परिवार यांना पुरस्कार प्राप्त झाला. तसेच समूह नृत्य मधे दिपक गिरी सर व जोडी नृत्य मधून शिवकुमार सोनवणे सर यांना जिल्यातील प्रतिष्ठित समजला जाणारा बेस्ट डान्स टीचर पुरस्काराने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. तसेच राज्य बालनाट्य स्पर्धेत उत्तम अभिनयासाठी युवराज घाडगे व विशेष सहकार्यासाठी विवेक शर्मा याला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ह्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तथा नियोजन रोहित पुराणिक सर यांनी केले. ह्या यशाबद्दल आर्ट ऑफ फन अकॅडमी मधील सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.गणेश अवंतकर सर, व साई सेवाभावी संस्था कोळगाव, ता.गेवराई जि.बीड यांनी मार्गदर्शन तथा सहकार्य केले..
Discussion about this post