तेरणा कारखान्याची विक्री प्रक्रिया थांबवा
तेरणा बचाव संघर्ष समिती आज देणार निवेदन
शशिकांत भुतेकर
धाराशिव तालुका प्रतिनिधी
ढोकी :- मराठवाड्यातील सहकारी तत्त्वावरील सर्वात पहिला व महाराष्ट्रत गाजलेला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्री करण्याचा घाट जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घातला जात आहे आम्ही तेरना विकू देणार नाहीत असा आक्रमक पवित्रा तेरणा बचाव संघर्ष समितीने घेतला आहे.
याबाबत तेरणा बचाव संघर्ष समितीची तेरणा साखर कारखाना विक्री करून खाजगीकरण करण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप तेरणा बचाव समितीने केला आहे याबाबत समितीच्या वतीने सांगण्यात आले की आम्ही तेरनेचे सभासद कारखान्या कधीही विक्री करू देणार नाही हे कधीच होऊ देणार नाही, तेरणा कारखान्याच्या मालमत्तेतील एक इंच ही जमिनी विक्री होऊ देणार नाहीत
असा आक्रमक पवित्रा तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. 21 ऑगस्ट 2024 रोजी बुधवारी जिल्हा मध्यवर्ती बँक व आवसायक आणि जिल्हाधिकारी धाराशिव यांना या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे तसेच डीसीसी बँक यांना इशारा देण्यात येणार आहे.
कारखाना सर्व काही व्यवस्थित चालू असताना हा विक्री करण्याचा डाव जो टाकलेला आहे तो तेरनेचे बत्तीस हजार सभासद, ऊस उत्पादक शेतकरी तेरणा परिसरातील नागरिक हा तुमचा कुटील डाव हाणून पाडणार आहेत मराठवाड्यातील पहिला सहकारी तत्त्वावर चालणारा कारखाना म्हणून याची ओळख आहे नाडे, समुद्रे, घोघरे, पाटील या तत्कालीन मंडळींनी ज्या कष्टाने त्यांच्या प्रयत्नातून हा कारखाना उभा राहिला आणि
तो सहकारी तत्त्वावरील कारखाना खाजगीकरण करून सभासद यांच्याकडून हिसकावून घेण्याचा डाव आहे तो कदापिही शक्य होऊ देणार नाहीत आणि कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही या संदर्भात तेरणा परिसरातील सभासदांनी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी दिनांक 21 ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी एक वाजता जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे निवेदन देण्यासाठी. तेरणा साखर कारखान्याच्या कळंब व धाराशिव तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तेरणा बचाव संघर्ष समिती यांच्या वतीने करण्यात आलं आहे.
Discussion about this post