
लोहा कंधार प्रतिनिधी……………………………… मुरंबी नगरीत दिनांक 22 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा शिवश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्य भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन मुरंबी नगरीतील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या नेतृत्वाखाली करण्याचे ठरविले आहे……………,………………….. मुरंबी नगरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य राजे छत्रपती शिवाजी महाराज युवा मंच मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरंबी येथील मुला-मुलींना फळे तसेच साहित्य वाटप करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरब्बी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे गावातील नागरिकांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची भव्य दिव्य अशी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करून डी जे च्या तालावर ती , लहान मुला मुलींची वेशभूषा देखावा करत भव्य दिव्य मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून गावामध्ये निघणार आहे…………………………………. या कार्यक्रमानिमित्त शिवश्री शिवव्याख्याते बालासाहेब पाटील जाधव, शिवव्याख्याते शिवश्री कृष्णा पाटील भागवत यांच्या वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र जीवन गाथा ऐकण्यास मिळणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आव्हान राजे छत्रपती युवा मंच , तसेच सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील पवार उपाध्यक्ष कार्तिक नरवड, संयोजक मंगेश पाटील पवार, स्वागताध्यक्ष अनिकेत धापसे, ओम पवार, मंगेश विभुते यांनी केले आहे.
Discussion about this post