दिंनाक-20.02.2025
सोलापुर प्रतिनिधी
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा उंदरगाव येथे बुधवार दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीश्रीश्री शिवछत्रपती यांची 395 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बहुतेक विद्यार्थ्यांनी शिवराय ,संभाजी आणि जिजाऊं चा वेश परिधान केल्यामुळे शिवमय वातावरण निर्मिती झाली होती.
विद्यार्थ्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवरायांची आरती गायली गेली. विद्यार्थ्यांनी शिवरायांचे विचार आपल्या आवेश पूर्ण भाषणातून व्यक्त केले. शिवजयंती निमित्त शिवरायांच्या चित्राचे रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मोठा प्रतिसाद दिला. गावातील शिक्षणप्रेमी पालक श्रीम. रेश्मा औदुंबर चव्हाण यांच्यातर्फे आपल्या मुलाच्या- हर्षवर्धनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन त्यांचे आभार व्यक्त करीत आहे. शिवरायांच्या विचाराचा आदर्श समाजापुढे वृद्धिंगत हवा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे यांनी सांगितले.
याप्रसंगी श्रीम. कुमुदिनी गिड्डे- कापसे मॅडम ,बिपिन कदम सर ,धनराज शिंदे सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बालाजी नाईकवाडे, शंकर साळुंखे इत्यादी उपस्थित होते.
Discussion about this post