
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
परिसरात बैलांच्या पटासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंडऊमरी येथे भव्य इनामी शंकरपटाचे आयोजन दि.23 व 24 फेब्रुवारी असे दोन दिवसीय शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे.
23 जानेवारी रोजी शंकरपटाचे उद्घाटन माजी खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी डॉ.सोमदत्त करंजेकर,जि.प.सदस्य मदन रामटेके, सेवा निवृत्त सहा.मत्सव्यवसाय आयुक्त मारोती चांदेवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे,शिवराम गिरेपुंजे, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल हलमारे, नगरसेवक मनिष कापगते,पं.स.सदस्या शालू नागरिकर, सरपंचा पोर्णिमा चांदेवार, उपसरपंच सत्यभामा नेवारे, सर्व ग्रा.प.सदस्यगण आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.प्रथम क्रमांकाच्या विजेत्या जोडीला 25 हजार, द्वितीय 21 हजार, तृतीय 19 हजार, चतुर्थ 16 हजार,पाचवे 14 हजार,सहावे 12 हजार,सातवे 10 हजार,आठवे 9 हजार यासह प्रत्येक विजेत्या जोड्याना बक्षीस दिले जाणार आहेत.तसेच प्रथम हरलेल्या जोड्यांना 5 हजार,4 हजार 3 हजार,2 हजार ,1,500 रुपये दिले जाणार आहेत.
तसेच 23 जानेवारीला रात्रौ 9.30 वाजता लोकांच्या मनोरंजनासाठी ‘ भटकलेली पाखरं’ या तीन अंकी नाटकाचे आयोजन लालबहादूर विद्यालयाच्या रंगमंचावर करण्यात आले असून या नाटकाचे उद्घाटन पं.स.उपसभापती करुणा वालोदे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार नानाभाऊ पटोले ,डि.से.को.बॅकेच्या संचालिका अंजिरा चुटे यांच्या हस्ते होणार आहे.तरी या शंकर पटात अधिकाधिक बैलजोड्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे..
Discussion about this post