


प्रतिनिधी : सचिन कोयरे..
येथील शिवजन्मोत्सव समिती आणि समस्त ग्रामवासी यांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती निमित्त आदर्श शोभायात्रा काढून मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरी केली.
या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम ग्रामपंचायत येथे छत्रपतींना अभिवादन करण्यात आले व त्यानंतर गावातून बाईक रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे छत्रपतींना अभिवादन केले. तसेच सुजित टिपले यांनी शिव गर्जना देत संपूर्ण वातावरण शिवमय केले.अकोला बाजार येथील नवीन करियर करणार्या विद्यार्थांना प्रोत्साहन मिळण्यासाठी, त्यांना चालना मिळण्यासाठी येथील नव्यानेच शासकीय सेवेत दाखल झालेल्या शेख सरफरोश शेख सब्बलखान, धीरज आनंदराव नेवारे, कार्तिक रामभाऊ कराळे यांचा या प्रासंगिक ग्राम विकास अधिकारी सुनील भाकरे,राजू मादेश्वर,हमीद पठाण, सरपंच राजूरकर, उपसरपंच मोगरे आणि अजय जगताप प्रविण राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची आदर्श शोभायात्रा काढण्यात आली, या शोभायात्रेत लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल रुई (वाई) येथील लहान चिमुकल्यांनी अफजल खानाचा वध यावर नाट्य सादर करून चिमुकल्यांनी सर्वांची मने जिंकली.
१६ फेब्रुवारीला रांगोळी, मडका फोड तर १८, १९ फेब्रुवारी रोजी चित्रकला व वेषभूषा झालेल्या स्पर्धेत प्रावीण्य मिळवणार्या विद्यार्थ्यांना मंचावर उपस्थित असणारे मान्यवर सरपंच योगेश राजूरकर, उपसरपंच प्रविण मोगरे, आणि पोलिस उपनिरीक्षक भाऊरावजी बोकडे यांच्या हस्ते बक्षीस देऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आहे.
या प्रासंगिक वडगाव जंगल पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले भाऊरावजी बोकडे यांची पोलीस उपनिरीक्षक या पदी पदोन्नती झाल्याने त्यांचा शिवजन्मोत्सव समितीच्या आणि संपूर्ण युवक वर्गाच्या वतीने सन्मान करून सत्कार करण्यात आला. आणि सर्वांना भोजन देऊन समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शिवजन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक गिरीश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश जगताप, दर्शन जगताप, विशाल अल्डक, कान्हा नांगलीया, वैभव जाचक, अक्षय ठाकरे,गौरव जगताप, पवन जगताप, कांचनकुमार भवरे, तेजस डाखोरे,सचिन नलगे, राम कोटरंगे,शुभम नन्नवरे,गौरव कावळे, अर्जुन जगताप,गौरव नलगेसह गावातील युवकांनी मोठी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन व आभार सचिन कोयरे यांनी केले.
Discussion about this post