
लाडजळगाव प्रतिनिधी :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती दिवटे गावामध्ये उत्साहात जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त भगव्या पताकांनी गाव उजळून निघाले होते. तर शिवरायांच्या मिरवणुकी दरम्यान शिवभक्तांनी जयघोष करत वातावरण दणाणून सोडले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची गावातून संध्याकाळी सात वाजता मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत फुलांची उधळण करत व फटाक्यांची आजबाजी करत शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यात आले. गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला भव्य स्वरूप दिले. जयंती उत्सवात गावातील लहान मुले व मुली यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला..
Discussion about this post