
महाराष्ट्र उदयगिरीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी……..
उदगीर…(श्रीधर सावळे)महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य व माजी आमदार मनोहरराव पटवारी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, स्टाफ सेक्रेटरी डॉ. बी. डी. करंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. एस. होकरणे, दिनविशेष समिती प्रमुख प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर, ग्रंथपाल लक्ष्मीकांत पेन्सलवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने आकर्षक देखावा सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांच्या वेशभूषेत साकारलेली मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख, तलवारी आणि भगवे ध्वज घेऊन उत्साहात सहभाग घेतला.
Discussion about this post