
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
महामाया महिला सामाजिक न्याय्य संघटना महाराष्ट्रातील पदाधिकारी यांचे सभा साकोली येथील विश्रामगृहात घेण्यात आली व शिवजयंती साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महामाया सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी. जी. रंगारी होते तर प्रमुख अतिथी म्हणून महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शितल नागदेवे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मीनाक्षी वाहने,महाराष्ट्र संघटक मनीषा खोब्रागडे, विदर्भचे रत्ना खंडारे, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष नीलिमा वाणी, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रज्ञा उपाध्ये , वर्षा दूधकुरे, भंडारा जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा हुंमने ,गोंदियाच्या दीक्षा ऊके , तुमसर तालुका अध्यक्षा शालिनी बागडे आदी मान्यवरांचे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते त्यांचे कार्य बहुजनांच्या कल्याणासाठी होते त्यांच्या राज्यात सर्वांना समान संधी, सामान न्याय असं राज्यकारभार एक सुरळीत सुरू होता सर्वांना त्यांच्या राज्यात न्याय मिळत होता असे डी. जी. रंगारी यांनी व्यक्त केले .
तसेच महामाया संघटना वाढवण्याविषयी सर्व महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता संघटनेचे कार्य चालू राहील या विषयावर मत मांडले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शितल नागदेवे यांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला व संघटनेचे महत्त्व काय याविषयी मार्गदर्शन केले .
मीनाक्षी वाहने यांनी सुद्धा मार्गदर्शन केले,
मनीषा खोब्रागडे, साधना रामटेके ,शालिनी बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन साकोली तालुका अध्यक्ष साधना रामटेके यांनी केले तर आभार सुवर्णा हुमणे यांनी मानले.
कार्यक्रमाला वंदना वंजारी ,निर्मला हुमने, सरिता बडोले,तृप्ती वासनिक, वर्षा बोरकर ,मीरा कांहेकर, ज्योती गडपायले,अर्चना घनाडे, शालिनी काणेकर, सुरेखा मेश्राम, अहिल्या खोब्रागडे, सुनंदा भोवते, रेखा टेंभुर्णे यांच्या सह महिला याप्रसंगी मोठ्या संख्येत उपस्थित होते..
Discussion about this post