
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
येथील ग्रामपंचायत कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंचा पोर्णिमा चांदेवार यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सत्यभामा नेवारे, ग्रामपंचायत अधिकारी एल.के.हेडाऊ,ग्रा.पं.सदस्य प्रमोद ऊके, ज्ञानेश्वर लोथे, रेखा रामटेके, कविता कोल्हे, लिना चांदेवार,अतुल खोब्रागडे,ग्रा.पं.कर्मचारी घनश्याम गोटेफोडे, मंगेश ईरले, रोजगार सेवक दिलीप ऊके,संगणक परिचालक रोशन लोथे,तमुस अध्यक्ष सेवक कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post