
पाथरी (प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी परभणी..
परभणी तालुक्यातील लोहगाव येथील लोकशिक्षण सार्वजनिक वाचनालयात दिनांक १९ फेब्रुवारी सोमवार रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत ,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे ग्रंथपाल शेख हयातभाई यांनी सर्वप्रथम छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कैलास हजारे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणुन सय्यद मैनूभाई , तल्ला ईनामदार , बालाजी हजारे ,गणेश तायडे ,मुन्ना अंभुरे ऊपस्थीत होते या कार्यक्रमात ग्रंथपाल शेख हयात भाई यांनी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महारांजाचे चरित्र विद्यार्थ्यांना ऊलगडुन सांगितले .व छत्रपती शिवाजी महारांजिविषयी मुद्देसुद माहिती सांगितली .या कार्यक्रमास वैभव हजारे ,राजेभाउ हजारे ,गोविंद धोत्रे व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची शिवप्रेमी ची ऊपस्थीती होती.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post