गडचिरोली- चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या चामोर्शी- आष्टी रोडवर येणापूर पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर सोमनपल्ली बसस्थानक आहे, त्या बस्थानकच्या भिंतीवर ठळक अक्षरामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत कुणीतरी अज्ञानानी अर्वाच्च शब्दात लिखान करून जातीयवादाची पुनरावृत्ती झाली हे लक्षात येते.
दि. 20 फरवरी 2025 गुरुवार रोजीची ही घटना असून सोमनपल्ली येथील सामाजीक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व त्वरित ही बाब सोमनपल्ली हद्दीतील आष्टी पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.ही सर्वोसर्वी माहिती कळताच संपूर्ण भीमसैनिक, सामाजिक संघटना यांनी बसस्थानक गाठून पाहणी करून सोमनपल्ली हद्दीतील येणारे पोलीस स्टेशन यांना पाचारण करण्यात आले.
त्यावेळेस आंबेडकरी सामाजिक पार्टी, भीमअनुयायी उपस्थित होते.
सदर कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा तपास करून त्वरित अटक करावी आणि योग्य ती कार्यवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण सामाजिक संघटना व भीमअनुयायी यातर्फे होतं आहे..

प्रतिनिधी:- आशिष लाकडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली (9421332384)
बातम्या व प्रतिनिधी होण्या साठी संपर्क:- ७७४४९२२०००
Whatsapp च्या ग्रुप ला जॉईन होण्या साठी खाली लिंक वर क्लिक करा
Discussion about this post